breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अभिनेता प्राचीन चौहानला अटक, तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप

मुंबई – स्टार प्लस वाहिनीवरील ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेतून टीव्ही जगतात पदार्पण केलेला अभिनेता प्राचीन चौहान याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपात प्राचीनला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेने मालाड पूर्व पोलीस ठाण्यात प्राचीनविरोधात गुन्हा दाखल केला असून तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३५४, ३४२,३२३,५०२(२) अंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, प्राचीनने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर तो उन्होंने ‘कुछ झुकी पालके’, ‘सिंदूर तेरे नाम का सात फेरे’ अशा काही मालिकांमधून झळकला. तर सध्या यूट्यूबवरील प्रसिद्ध वेब शो ‘शिट्टी आयडियाज ट्रेंडिंग’मध्ये छवी मित्तल आणि पूजा गौरकेसोबत तो काम करतोय.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button