breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कार्यकर्त्यांनी संघटना बळकट करावी : प्रा. लक्ष्मण ढोबळे

पिंपरी । प्रतिनिधी

बहुजन रयत परिषदेच्या सर्व जुन्या-नव्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संघटना वाढीसाठी, संघटना बळकट करण्यासाठी तसेच संघटनेचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, असे प्रतिपादन बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी केले.

बहुजन रयत परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय पदाधिकारी बैठक शनिवारी दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी ठिक 9.00 वा. राणी पुतळाबाई महिला विधी महाविद्यालय, भोसरी या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघटनेच्या ध्वजाचे अनावरण प्रा. लक्ष्मण ढोबळे संस्थापक, अध्यक्ष बहुजन रयत परिषद यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदेश अध्यक्ष रमेश(तात्या) गालफाडे तसेच महिला प्रदेश अध्यक्ष
अ‍ॅड. कोमलताई साळुंखे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

सकाळी 10.00 वा. नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती या भागातील विभागप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांनी आपल्या भागातील अडचणी व संघटनेबद्दल, कार्याचा आढावा सादर केला. त्यानंतर दुपारी 1 ते 2 भोजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दुसर्‍या सत्रामध्ये औरंगाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, मुंबई येथील विभागातील जिल्हा प्रमुखांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर राज्य कार्यकारणीचे उपाध्यक्ष सूर्यकांत भालेराव, संपर्कप्रमुख रविंद्र पाटील, महासचिव रविंद्र वाकळे, प्रदेश सरचिटणीस ईश्वर क्षीरसागर, प्रदेश उपाध्यक्ष बालाजी गायकवाड व साहेबराव शृंगार राज्य सदस्य, बंडुनाना गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजय डोंगरे, विदर्भ प्रमुख यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा अध्यक्ष सुनिल भालेराव जालना, साहेबराव गुंडीले नांदेड, गणेश साठे, नंदूरबार, अभिजित देडे उस्मानाबाद, प्रकाश बोरसे जळगाव, नानासाहेब खंडाळे नाशिक, संजय खडसे यवतमाळ, प्रेम गालफाडे औरंगाबाद, सौ. पंचशीला थोरात औरंगाबाद, धनराज भिसे पुणे, जगन्नाथ आव्हाड अहमदनगर, ना. म. साठे अहमदनगर, भगवान गोरखे श्रीगोंदा यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर श्री. अब्राहम (बापू) आवळे शाहू शिक्षण संस्था अध्यक्ष व सौ. क्रांतीताई आवळे प्रशासन अधिकारी शाहू शिक्षण संस्था, अनिल कोल्हे निकेतन संस्था अध्यक्ष, सिद्राम जावीर शाहू शिक्षण संस्था सचिव हे उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी राज्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी व माजी जुने पदाधिकारी विजयकुमार गायकवाड, सोमनाथ कांबळे, प्रा. बबन गायकवाड, बबन नेटके, काका शेलार हे उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमासाठी दत्तात्रय पाटील, अजय साळुंखे साहेब, मनिषा खरात, निशा सिंग, ऐश्वर्या टिजगे, विशाल खंदारे, लॉ कॉलेजचे प्राचार्य महेंद्र खरात, प्राजक्ता जोशी मॅडम प्राचार्या ओअ‍ॅसिस इंग्लिश मिडीयम स्कूल अ‍ॅन्ड ज्यु. कॉलेज यांनी परिश्रम घेतले.

शेवटी सर्व पदाधिकारी यांना दादासाहेब सोनवणे यांनी मार्गदर्शन केले व बहुजन रयत परिषदेचे ध्येय धोरण वाढविण्याबाबत श्री. रमेश (तात्या) गालफाडे यांनी मार्गदर्शन केले. महिला प्रदेश अध्यक्षा यांनी महिला सबलीकरण, महिला एकत्रीकरण संघटनेसाठी महत्वाचे आहे. जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग नोंदवून बहुजन रयत परिषद महिला आघाडी मोठ्या जिद्दीने व ताकदीने काम करण्यासंदर्भात महिलांचा मोठा प्रतिसाद मिळविण्यासाठी जिल्हानिहाय महिला मेळावे घेण्याचे आव्हान केले.

संस्थापक अध्यक्ष प्रा. लक्ष्मण ढोबळे साहेब यांनी संघटनेबद्दल शिस्तीचे नियोजनाचे व कार्यकर्त्यांमध्ये संपर्कात राहून, विभागीय मेळावा जिल्हा मेळावा घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच येणार्‍या नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे व शासकीय योजना वेचून आणण्यापेक्षा खेचून आणण्याचे कार्य करावे व अनुसूचित जातीसाठी अ.ब.क.ड. वर्गवारी करण्यासाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भाग भांडवल 1000 कोटी करण्याबद्दल संघटनेच्या माध्यमातून मोठ्या धाडसाने शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करून मेळावे घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या. अन्याय झालेल्या समाजाला न्याय मिळण्यासाठी संघटनेच्या वतीने कशा पद्धतीने मोर्चे आंदोलन करण्यात येतील, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी संघटीत राहून संघटन करण्याबद्दल व वाढविण्याबद्दल प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हा अध्यक्षांनी सतर्क राहून कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी राज्यातील नवीन व जुने पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button