Views:
10
पिंपरी l प्रतिनिधी
धोकादायकपणे गॅस चोरी करुन त्याची विक्री केल्या प्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करुन दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 19) दुपारी पावणे पाच वाजता च-होली येथे करण्यात आली.
सुनील दत्तात्रय विंचुरे (वय 28, रा. च-होली फाटा, ता. हवेली) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह आणखी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील याने धोकादायकपणे घरगुती वापराचे सिलेंडर मधून लहान सिलेंडरमध्ये गॅस काढून त्याची चोरी केली. याद्वारे त्याने ग्राहकांची आणि शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी कारवाई करून पोलिसांनी सुनील याला अटक केली. तसेच त्याला हे कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणा-या जागा मालकाच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.