ताज्या घडामोडीराष्ट्रिय

८ सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा; आरबीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड

महाराष्ट्रासह देशातील ८ सहकारी बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. त्यात या सहकारी बँकांना १२ लाखांपेक्षा अधिक दंड केला आहे. यात महाराष्ट्रातील नाशिकच्या मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेचा समावेश आहे.

बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर, गुजरात, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील ८ सहकारी बँकांवर दंडाची कारवाई केली आहे. त्यात पश्चिम बंगालच्या नाबापल्ली सहकारी बँकेला सर्वात जास्त म्हणजे ४ लाखांचा दंड केला आहे. तर सगळ्यात कमी म्हणजे २५ हजारांचा दंड नाशिकमधील मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँकेला केला आहे. मध्य प्रदेशातील जिल्हा सहकारी केंद्रीय बँक, मणिपूरमधील मणिपूर महिला सहकारी बँक, उत्तर प्रदेशातील युनायटेड इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक, हरियाणातील बघाट को-ऑपरेटिव्ह बँक आणि गुजरातमधील नवनिर्माण सहकारी या बँकांना एक लाखांपर्यंत दंड ठोठावला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button