ताज्या घडामोडीपुणे

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला 10 वर्षांचा सश्रम कारावास व 1 लाखांचा दंड

पुणे | पिण्यासाठी पाणी मागण्याचा बहाणा करून अल्पवयीन मुलीला वेळोवेळी बंगल्यात एकटीला बोलावून तिच्यावर बलात्कार करत, याबाबत वाच्यता केल्यास तिला व तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी देणार्‍या नराधमावर तीन वर्षापूर्वी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला न्यायालयाने दोषी ठरवत बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 6 अन्वये दोषी ठरवत 10 वर्षे सश्रम कारावास व 1 लाख रूपये दंड, दंड न भरलेस 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.आप्पा यशवंत साळवे (वय 52 वर्षे रा. कुसगाव बु. लोणावळा ता. मावळ) असे या आरोपीचे नाव आहे. फेब्रुवारी 2018 ते मे 2018 दरम्यान ही घटना घडली होती.

लोणावळा येथे आई-वडील नसलेली एका अल्पवयीन (निर्भया) व अनाथ मुलगी तिच्या चुलत आजी सोबत रहात होती. ती रहात असलेल्या बंगल्याच्या शेजारील एका बंगल्यात काम करणार्‍या साळवे यांनी ओळखीचा फायदा घेत सदर मुलीला बंगल्यात एकटीला बोलावून तिला जिवे मारण्याची धकमी देवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.

अल्पवयीन मुलीस त्यापासून गर्भधारणा झाल्याबाबत दिनांक 13 मे 2018 रोजी लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे सदरचे अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून आप्पा यशवंत साळवे याच्या विरुद्ध लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं 142/2018 भादवि कलम 376, 506 सह बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 06 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरच्या गुन्ह्याचा तपास हा राधिका मुंढे तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक सध्या सहायक पोलीस निरीक्षक नेमणूक एस. बी. झोन 07 मुंबई शहर व शिवाजी दरेकर पोलीस उपनिरीक्षक यांनी करून आरोपी विरुद्ध गुन्ह्याचे दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले होते.

दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयाचे सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी आरोपी साळवे यास बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 कलम 6 अन्वये दोषी धरून 10 वर्षे सक्त कारावास व 1 लाख रुपये दंड, दंड न भरलेस 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

सदरचे खटल्याचे कोर्ट कामकाज लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी संदेश बावकर सहा पोलीस निरीक्षक व पोलीस हवालदार आल्ताफ हवालदार यांनी सत्र न्यायालयात कामकाज पाहिले.

सदर खटल्यात सरकारी वकील म्हणून प्रेमकुमार अगरवाल यांनी कामकाज पाहिले, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button