पिंपरी / चिंचवड

हॉस्पिटल, कॉलेज उघडण्याच्या बहाण्याने नागालँड येथील नागरिकांची फसवणूक करणा-या आरोपीला वाकड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी l प्रतिनिधी

नागालँड राज्यात हॉस्पिटल आणि कॉलेज उघडतो असे सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणा-या आरोपीला वाकड पोलीसांनी वाकड परिसरातून अटक केली. तसेच एका सोनाराची पुणे-मुंबई प्रवासादरम्यान दोन किलो सोने असेलेली बॅग चोरून नेणा-या टोळीतील एका आरोपीला देखील वाकड पोलीसांनी अटक केली आहे.

नागालँड मधील दिमापूर ईस्ट पोलीस ठाण्यात सन 2021 मध्ये एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्यातील आरोपीने हॉस्पिटल आणि कॉलेज उघडतो असे सांगून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यातील आरोपी भारत भानुदास इरटकर (रा. मोहन ग्रीनवुड, मांजरी रोड, बदलापुर (वेस्ट) ठाणे महाराष्ट्र) याचा शोध घेण्यासाठी नागालँड पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी महाराष्ट्रात आले.

आरोपी भारत याची माहिती काढली असता तो वाकड पोलिसांच्या हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत नागालँड पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना संपर्क केला. याबाबत सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिल्या. वाकड पोलिसांनी आरोपीला ताथवडे परिसरात तीन दिवस माग काढला आणि त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी भारत याला नागालँड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दोन किलो सोने पळवून नेणा-या टोळीतील आरोपीला अटक

मुंबई येथील मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यातील एक आरोपी वाकड परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. मुंबई पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांना याबाबत माहिती दिली असता वाकड पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपी अंकुश डिकोळे (वय 45) याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून मागील वर्षी एका सोनारावर पाळत ठेवली. त्यानंतर सोनार पुणे मुंबई मार्गावरून ट्रॅव्हल्सने प्रवास करत असताना त्याची सोन किलो सोने असलेली बॅग चोरट्यांनी चोरून नेली. त्यातील एक आरोपी अंकुश डिकोळे हा होता. त्याला देखील वाकड पोलिसांनी अटक केली आहे. त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरिक्षक संतोष पाटील, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस उप निरीक्षक गणेश तोरगल, पोलीस अंमलदार विक्रम कुदळ, चंदु गिरे, प्रमोद कदम, बापुसाहेब धुमाळ, कौंतेय खराडे, अतीक शेख, विक्रांत चव्हाण, अजय फल्ले, बाबाजान इनामदार, विजय गंभीरे, प्रशांत गिलबिले, बिभीषन कन्हेरकर, राजेंद्र काळे, कल्पेश पाटील, अतिश जाधव, दिपक साबळे यांच्या पथकाने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button