पिंपरी / चिंचवड

वाकडमध्ये दोघांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा

पिंपरी l प्रतिनिधी

वारंवार पोलीस ठाण्यात तक्रार करते म्हणून दोघांनी मिळून महिलेच्या घरात घुसून तीला जीवे मारण्याचा प्रय़त्न केला. बुधवारी (दि. 22) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास थेरगाव येथे ही घडली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुसदीक रफिक शेख (वय 27, रा. रहिमानिया मस्जित थेरगाव) आणि 25 वर्षीय अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. 23) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची बहिण राणूबाई बारणे शाळेत प्रवेशाच्या कामासाठी गेल्या होत्या. तेथून परत घरी येत असताना आरोपी शेख याने त्यांच्याकडे पाहत ‘तु बार बार मेरा कंप्लेंट करने के लिए पोलीस स्टेशन जाती है ना, आज मै तेरा गेम करता हू, कौनसा ऑफिसर तुम्हे बचाने के लिए आता है मै देखता हू, और एक मैरे खिलाफ कंप्लेंट कर’, असे म्हणत धमकी दिली.

त्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास दोन्ही आरोपी फिर्यादी यांच्या घरात घुसले. त्यावेळी आरोपींकडे चाकूसारखी दोन हत्यार होती. ‘माझ्या भावास तुझी मुलगी देत आहेस. तुझ्यामुळे माझ्या भावास हुंडा भेटत नाही. एवढे बोलून आरोपीने फिर्यादी यांचा गळा पकडला आणि दुसऱ्या आरोपीनने फिर्यादींसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.

त्यानंतर आरोपी शेख याने त्याच्याकडील चाकून फिर्यादी यांच्यावर वार केला. फिर्यादी यांनी हात आडवा घातल्याने तो त्यांच्या हाताला लागला. अन्यथा चाकू गळ्याला लागून त्यांच्या जीव गेला असता. दरम्यान, फिर्यादी यांचा जावाई आणि भाऊ तेथे आले. आरोपींनी त्यांनाही लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button