breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

टेम्पोत अत्याचार करून हत्या, साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीला फाशी

मुंबई: साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी मोहन चौहान या आरोपीला न्यायालाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ३१ मे रोजी मोहन चौहानला (Mohan Chouhan convicted) याप्रकरणात दोषी ठरवले होते. यावर शिक्षेची सुनावणी आज दिंडोशी सत्र न्यायालयात पार पडली. ज्यामध्ये न्यायायलायाने दोषीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. साकीनाका येथे एका महिलेवर बलात्कार (Sakinaka rape and murder case) करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सोमवारी (३० मे) ४५ वर्षीय मोहन चौहानला दोषी ठरवले. त्याने ३४ वर्षीय महिलेवर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनात बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती.

मोहन याने पीडित महिलेच्या गुप्तांगावर रॉडने वार केले होते. त्यात ती गंभीर जखमी झाली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ही घटना घडली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर जलदगतीने तपास करत पोलिसांनी १८ दिवसांत आरोपपत्र दाखल केले होते. दिंडोशी न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी आरोपीला बलात्कार आणि खून प्रकरणी त्याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button