पिंपरी / चिंचवड

पुणे-मुंबई महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू, पाचजण जखमी

पिंपरी l प्रतिनिधी

पुणे-मुंबई महामार्गावर रावेत परिसरात भीषण अपघात झाला. यामध्ये एका ट्रकने रस्त्यावर काम करणाऱ्या पाच ते सहा कामगारांना चिरडले आहे. ही घटना समीर लॉन्सजवळ सोमवारी (दि. 30) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली.

पुणे-मुंबई महामार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. रात्री देखील हे काम सुरू होते. सोमवारी पहाटे रस्त्याचे काम करत असलेल्या कामगारांना पुण्याकडून येणाऱ्या एका ट्रकने उडवले. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. यात एका कामगाराचा जागेवर मृत्यू झाला. तर चार ते पाच कामगार जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच रावेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मयत आणि जखमींची नावे समजू शकली नाहीत. याबाबत गुन्हा दाखल करून पुढील तपास रावेत पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button