ताज्या घडामोडीमुंबई

लग्नसोहळ्याला निघालेल्या बसचा अपघात

खेड|मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळच्या सुमारास दोन अपघात झाले आहेत. पहिला अपघात खेड मुंबई गोवा महामार्गावर कळंबणीजवळ खासगी बसला झाला आहे. या अपघातात २५ जण जखमी झाले आहेत. तर, दुसरा अपघात मुंबईवरून जयगड रत्नागिरी येथे निघालेल्या तवेरा कारला अपघात झाला असून एकाच कुटुंबातील सात जण जखमी झाले आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर भरणे नाक्याजवळ रिलायन्स पेट्रोल पंप येथे खासगी लक्झरी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात तब्बल सुमारे पंचवीस प्रवासी जखमी झालेत. बुधवारी आज पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात ठिकाणी तात्काळ खेड पोलीस व मदत ग्रुपचे कार्यकर्ते यांनी धाव घेऊन जखमींना कळंबणी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. या सगळ्या जखमी प्रवाशांवर उपचार सुरु आहेत. यातील दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई परेल येथून केळणे गोमळेवाडी येथे लग्नकार्यासाठी निघालेली ही बस होती. महामार्गावरील भरणे नाका येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आली असता चालकाला डुलकी लागल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली.

मध्यरात्री परेल येथून निघालेली खासगी आराम बस महामार्गावरील भरणे नाका परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक पोहचली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या डाव्या बाजूला खड्ड्यात पलटी झाली. भरधाव वेगातील बसला अपघात होताच बसमधील प्रवाशांनी जोरात आरडाओरडा करायला सुरवात केली. अपघातादरम्यांन झालेला जोरदार आवाज आणि प्रवाश्यांचा आरओरडा ऐकून ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम ग्रामस्थांनी सुरु केले. दरम्यान खेड येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेची तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. या अपघाताच खबर लग्नकार्य असलेल्या केळणे गावात कळताच ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली.

अपघातातील जखमी सध्या कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून खेड पोलीस घटनास्थळी पंचनाम्याची रवाना झाले आहेत. वनिता महेंद्र गोमले-५८, अविनाश रामचंद्र गोमले-३१, अल्पेश अरुण गोमले-३४, संदिप तुकाराम गोमले-४५, अनंत सिताराम खेराडे-६७, राजाराम धोंडु गोमले-५२, रविंद्र धोंडु साळुंखे-६१, वैजयंती लक्ष्मण गोमले-५५, विठ्ठल धोंडु बोले-५६, लक्ष्मण महादेव गोमले-६६, ओंकार भगवान गोमले-२६, मनोहर सदाशिव गोमले-६२, भावेश बाबु गोमले-१९, अस्मिता सोनू गोमले-५८, बाळकृष्ण तुकाराम गोमले-६४, नितेश मधुकर गोमले-२३, दशरथ राजाराम गोमले-४५, अल्पेश विजय गोमले-२८, दिनेश विजय गोमले-२६, महेंद्र दत्ताराम गोमले-३२, अस्मिता अंकुश गोमले-४५, सदानंद बाबू गोमले-४७ खेड पोलीस ठाण्यात अपघात नोंद करण्याची कार्यवाही सुरू असुन अधीक तपास खेड पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button