ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धावत्या बसमध्ये चालकास भोवळ आल्यामुळे अपघात

परभणी| जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात कळमनुरी औरंगाबाद या बस चालकाला धावत्या बसमध्येच भोवळ आल्याने बस थेट निळकंठ हॉटेल समोरील नागरिक व वाहनावर जाऊन झाडाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला असून या अपघातात चालकासह तीन ते चार प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत .तर अपघातामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले असल्याची घटना १५ एप्रिल रोजी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर शहरातील बसस्थानकातून औरंगाबाद वरून कळमनुरी जाणारी बस प्रवाशांना घेऊन बस चालक दादाराव संभाजी धनवे (वय ५० रा.वाई ता.कळमनुरी जि.हिंगोली) बस क्रमांक MH 13 CU 7543 ही बस दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी दहाच्या सुमारास ४० ते ४५ प्रवासी घेऊन कळमनूरीकडे निघाले. ही बस शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात आली असता बस चालकाला अचानक भोवळ आल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला. यावेळी बस निळकंठ हॉटेल समोर उभ्या असलेल्या नागरीक व वाहनांना ठोकरून थेट झाडावर जाऊन आदळली.

यावेळी अचानक झालेल्या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. आजूबाजूला उभे असलेले नागरिक बाजूला झाले. मात्र यात बसचालक दादाराव धनवे व प्रवाशी सुजाता श्रीकांत बोकसे (वय २७), तुळशीराम चंपतराव तारे (वय ५० वर्षे), श्रृती गजानन तारे (वय १४ वर्षे) हे जखमी झाले. यावेळी जखमींना नागरिकांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावर उभ्या असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button