breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आद्य क्रांतीगुरू लहुजी साळवे व क्रांतिकारक वासुदेव फडके यांच्या स्मारकाच्या कामाला गती द्या – अनुराधा गोरखे

पिंपरी – आद्य क्रांतीगुरू लहुजी साळवे व क्रांतिकारक वासुदेव फडके यांच्या चिंचवड येथील स्मारकाच्या नूतनीकरण कामाला गती द्यावी. 14 नोव्हेंबर 2021 च्या आत पूर्ण करावे अशा सूचना नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे व क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या चिंचवड स्टेशन येथील स्मारकाचे नूतनीकरणाच्या कामाला नगरसेविका गोरखे यांनी भेट दिली. या कामाला मी स्वतः पाठपुरावा करून बजेट आणले. त्यानंतर काम सुरू झाले.

नूतनीकरणाचे काम वस्ताद लहुजी यांच्या जयंतीच्या दिवशी (14 नोव्हेंबर) पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. कोरोनामुळे हे काम गेल्या दोन वर्षा पासून रखडले होते. त्याला सद्या गती देणे आवश्यक आहे. याबाबत लवकरच आयुक्तांना भेटून चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button