breaking-newsराष्ट्रिय

ABVP ने देशद्रोही म्हटल्याने अहमदाबाद विद्यापीठात रुजू होण्यास रामचंद्र गुहांचा नकार

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभविप) प्रसिद्ध इतिहासकार व लेखक रामचंद्र गुहा यांना देशद्रोही म्हणण्यात आल्याने त्यांनी अहमदाबाद विद्यापीठात रुजू होण्यास नकार दिला आहे. अभविपने दोन आठवड्यापूर्वी रामचंद्र गुहा देशद्रोही आणि शहरी नक्षली असल्याचे सांगत त्याच्या नियुक्तीला विरोध केला होता. आपल्याला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर गुहा यांनी गुरुवारी रात्री ट्विट करून आपण रुजू होणार नसल्याची माहिती दिली.

आपल्या ट्विटमध्ये गुहा म्हणतात, ‘सध्याची परिस्थिती माझ्या नियंत्रणाबाहेर असल्याने मी अहमदाबाद विद्यापीठात रुजू होऊ शकत नाही. अहमदाबाद विद्यापीठाला शुभेच्छा. विद्यापीठाला उत्तम प्राध्यापक आणि कुलगुरू लाभलेले आहेत. महात्मा गांधींजींच्या जन्मभूमी असलेल्या गुजरातमध्ये त्यांच्या विचारांचे चैतन्य पुन्हा एकदा पसरो हीच इच्छा’

Ramachandra Guha

@Ram_Guha

Due to circumstances beyond my control, I shall not be joining Ahmedabad University. I wish AU well; it has fine faculty and an outstanding Vice Chancellor. And may the spirit of Gandhi one day come alive once more in his native Gujarat.

१६ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाने गुहा यांची नियुक्ती मानवता व गांधी विंटर स्कूलच्या संचालकपदी करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र १९ ऑक्टोबर रोजी अभविपने गुहा यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. अभविपने गुहा यांना विरोध केल्याच्या वृत्ताला अभविप अहमदाबादचे सचिव प्रविण देसाई यांनी दुजोरा दिला. या संदर्भात इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, आम्ही विद्यापिठाचे रजिस्ट्रार बी. एम. शाह यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केल्याची माहिती देसाईंनी. आम्हाला विद्यापीठात बुद्धिवादी हवेत, देशद्रोही आणि शहरी नक्षली नकोत असे सांगतानाच गुहा यांच्या पुस्तकांमधील कथित देशद्रोही मजकूर विद्यापीठ प्रशासनापुढे आम्ही सादर केले होता. तसेच शाह यांना आम्ही गुहा हे डाव्या विचारसरणीचे असल्याचे सांगितले. तुम्ही ज्या व्यक्तीची नियुक्ती करत आहात ती डाव्या विचारसरणीची असून हिंदूविरोधी आहे. गुहा यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठात दिल्लीमधील जवाहरलाल नेहरु विद्यापिठासारखी राष्ट्रविरोधी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असेही अभविपने विद्यापिठांच्या रजिस्ट्रार सांगितले होते.

आपल्या निवेदनामध्ये अभविपने गुहा यांचे लिखाण विभाजनवादी असून ते व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली विभाजनवादाला खतपाणी घालतात, वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली दहशतवाद्यांना मुक्त करणे तसेच जम्मू-काश्मीरला भारतापासून वेगळे करण्यासारखे विचार मांडत असल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी अशा विषयांवर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि हैदराबादमधील सेंट्रल विद्यापिठात विचार मांडल्याचे अभविपचे म्हणणे आहे.

या विरोधाच्या पार्श्वभूमीवर विद्यापिठाने गुहा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या नियुक्तीच्या तारखेबद्दल चर्चा केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. गुहा यांची नियुक्ती १ फेब्रुवारी २०१९ पासून करण्यात आली होती. मात्र आता या निर्णयानंतर ते हा पदभार स्वीकारणार नाही असे स्पष्ट होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button