ताज्या घडामोडीपुणे

सार्वजनिक स्वच्छतागृहात अल्पवयीन मुलावर अत्याचार; पुण्यातील घटनेने खळबळ

पुणे | पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतुन एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सोळा वर्षीय मुलाला स्वच्छतागृहात फरफटत घेऊन जातात त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. दांडेकर पुलाजवळील पीएमटी बस स्टॉपजवळ पीडित मुलगा थांबला असताना हा प्रकार घडला. शुक्रवारी भरदुपारी हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी सागर पोपट सोनवणे (वय 21, रा. दांडेकर पुल) याला अटक केली आहे. याबाबत 16 वर्षीय मुलाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की शुक्रवारी दुपारच्या सुमारास पीडित मुलगा हा एका मित्रासोबत
दांडेकर पुलाजवळील पीएमटी बस स्टॉपवर थांबले होते. त्यावेळी आरोपी सागर सोनवणे हा तेथे आला. त्याने मुलाला फरफटत ओढत येथे असलेल्या सार्वजनिक स्वच्छता गृहात नेले. त्याठिकाणी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचारकरून बलात्कार केला. हा मुलगा या घटनेने घाबरला होता. त्याने पोलीसांकडे धाव घेऊन याची माहिती दिली. पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत सागर याला अटक केली आहे. त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. अधिक तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button