breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वैद्यकीय सुविधांसह अन्य कामासाठी सुमारे 30 कोटीचा निधी मंजूर

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आवश्यक सरणाचा खर्च महापालिका करणार असून त्यासाठी येणा-या खर्चास स्थायी समिती सभेने मान्यता दिली. प्रती मृतदेह ६ हजार रुपये असा खर्च यासाठी निश्चित करण्यात आला होता, या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक इतर उपाययोजनांसाठी या खर्चामध्ये २ हजार रुपयांची वाढ स्थायी समितीने केली आहे. या विषयासह महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांचा खर्च, अवलोकन आणि ऐनवेळच्या विषयासह झालेल्या आणि येणा-या सुमारे ३० कोटी ९३ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते.

कोरोना बाधित मृत व्यक्तींच्या पार्थिवावर महापालिकेच्या विद्युत आणि गॅस दाहीनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. कोरोना बाधितांच्या वाढत्या मृत्यूसंख्येमुळे निगडी, सांगवी, भोसरी, लिंकरोड चिंचवड आणि नेहरूनगर येथील पारंपारिक स्मशानभूमींमध्ये कोरोना बाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेले लाकूड आणि गोव-यांसाठी ६ हजार रुपये खर्च येणार आहे. तसेच इतर उपाययोजनांसाठी २ हजार रुपये अतिरिक्त वाढ करुन अंत्यसंस्कारासाठी प्रती मृतदेह एकूण ८ हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

प्रभाग क्र.२९ पिंपळे गुरव येथील गंगोत्रीनगर, विजयनगर, भालेकरनगर, साईनाथनगर, तुळजाभवानी नगर, सुवर्ण पार्क गुरुदत्तनगर, पंचरत्ननगर आणि इतर उर्वरित परिसरातील रस्ते अद्ययावत पध्दतीने विकसीत करण्याकामी ४ कोटी ९५ लाख ५४ हजार रुपये खर्च होणार आहेत. प्रभाग क्र. २९ पिंपळे गुरव मधील उर्वरित रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणेकामी ४ कोटी ९५ लाख ४८ हजार रुपये, च-होली येथील मैलाशुध्दीकरण केंद्राची देखभाल आणि दुरुस्ती करण्याकामी १ कोटी ३८ लाख ७५ हजार रुपये, प्रभाग क्र.३ मोशी – च-होली मध्ये अंतर्गत कॉलनी रस्ते आणि मुख्य डांबरी रस्त्यांची दुरुस्तीची कामे करण्याकामी ३१ लाख २७ हजार रुपये, प्रभाग क्र.३ मोशी च-होली येथील विविध ठिकाणच्या चरांची आणि डांबरी रस्त्यांची दुरुस्ती करण्याकामी ३१ लाख रुपये खर्च होतील.

प्रभाग क्र. २४ मधील कॉंक्रीट रस्त्यावर विद्युत विषयक कामे करण्यासाठी या ४४ लाख ६४ हजार रुपये, काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी बी.आर.टी रस्त्यावरील बस स्थानकांसाठी वाहतुक नियंत्रण दिवे बसविणे आणि मुख्य चौकातील यंत्रणेचे सिंक्रोनायजिंग करण्याकामी ३० लाख ३५ हजार रुपये, प्रभाग क्र. २३ मधील कॉंक्रीट रस्त्यावर विद्युत विषयक कामे करण्याकामी ४४ लाख ६४ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. या खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button