Uncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

पंजाबमधील आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर दगडफेक

चंदीगड | पंजाबमध्ये येत्या २० फेब्रुवारीला विधानसभेच्या ११७ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर राजकीय आरोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. प्रचार देखील शिगेला पोहचला आहे. यातच काल मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर रोड शो दरम्यान दडफेक करण्यात आल्याची घटना घडली. अमृतसर येथील अटारी भागातून भगवंत मान यांचा ताफा जात असताना अज्ञाताकडून त्यांच्यावर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये मान जखमी झाले आहेत.

भगवंत मान शुक्रवारी अमृतसर जिल्ह्यातील आपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी दुपारी अटारी मार्गावर त्यांचा रोड शो होता. त्यासाठी मोठी गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा त्यांचे समर्थक उभे होते. भगवंत मान हे त्यावेळी सनरूफ उघडून उभे राहिले होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी नागरिकांकडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता. त्याचवेळी गर्दीतील एका अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर दगड फेकण्यात आल्याने मान जखमी झाले. या घटनेनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरीही त्यांनी आपला प्रचार सुरूच ठेवला असल्याचे सांगितले जात आहे. पंजाबमधील विधानसभेच्या ११७ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर निकाल १० मार्चला निकाल लागणार आहेत. आपतर्फे भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button