TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

मावळातील शेकडो नागरिकांना ‘आधार’: गरजूंच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पार्थ पवार फाउंडेशनची मदत

– मावळ परिसरातील ग्रामीण भागात पार्थ पवार फाउंडेशनचे विधायक कार्य

– दृष्टीआड गेलेली सृष्टी पुन्हा पाहायला मिळत असल्याचे अनेकांना समाधान

पुणे l प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून मावळ परिसरात डोळे तपासणी शिबीर राबविण्यात येत आहे. या शिबिरात अनेकांच्या डोळ्यांची तपासणी केली जात असून ज्या नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशांची शस्त्रक्रिया करण्यासाठी पार्थ पवार फाउंडेशन मदत करीत आहे.

पार्थ पवार फाउंडेशनच्या माध्यमातून नुकतेच मावळ येथील ओवळे या गावात मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 130 नागरिकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. तपासणीअंती काही नागरिकांच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रकिया करणे आवश्यक भासले. 40 जण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आता शस्त्रक्रिया होणार आहे.

मावळ तालुक्यातील पवनानगर येथील येळेसे गावात पार्थ पवार फाऊंडेशनद्वारे मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात आले. तत्पूर्वी डोळ्यांच्या तपासणीसाठी आलेल्या ग्रामस्थांची प्रथम कोरोना चाचणी करण्यात आली. आपल्या गावात मोफत मोतीबिंदू तपासणीसह कोरोना चाचणीसारखी सुविधा देखील उपलब्ध झाली, या विचाराने ग्रामस्थ समाधानी झाले. या शिबिरात 85 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 40 जण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. त्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पार्थ पवार फाउंडेशन मदत करणार आहे.

मोतीबिंदू झाल्याने अनेकांना आपली नजर गमवावी लागते. दृष्टीआड गेलेली सृष्टी या नागरिकांना पुन्हा बघायला मिळणार असल्याने या नागरिकांच्या चेह-यावर आनंद ओसंडून वाहत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button