पिंपरी / चिंचवड

बहिणीच्या दुकानात गेलेल्या तरुणाला मेव्हण्यांकडून मारहाण

पिंपरी l प्रतिनिधी

बहिणीच्या दुकानात गेलेल्या तरुणाला दोन मेव्हणे आणि अन्य दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 19) सकाळी साडेदहा वाजता बारणे वस्ती, मोशी येथे घडली.

भावेश घिसुलाल चौधरी (वय 28, रा. मुंबई) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रमेश भुराराम चौधरी (वय 22, रा. निघोज, ता. खेड) आणि अल्पवयीन मुलगा तसेच अन्य दोन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शनिवारी सकाळी त्यांच्या बहिणीच्या कमल स्वीट या दुकानात बसले होते. त्यावेळी त्यांचा मोठा मेव्हणा रमेश तिथे आला. त्याने ‘तू आमच्या घरी कशाला आला होता’ असे म्हणून हाताने मारहाण केली. दुसरा मेव्हणा अल्पवयीन मुलगा याने लाथाबुक्क्यांनी पाठीवर, कानावर मारहाण केली. दोन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना कलरच्या डब्याने आणि लोखंडी सळईने मारहाण केली.

या भांडणात फिर्यादी यांची दोन तोळे सोन्याचे साखळी पडून गहाळ झाली. या प्रकरणाचे फिर्यादी यांची बहीण मोबाईलमध्ये शूटिंग करत असताना लहान मेव्हण्याने मोबाईल घेऊन तो जमिनीवर आपटून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button