पिंपरी / चिंचवड

दारू पिताना अर्ध्यातून घरी निघालेल्या तरुणाला दारूच्या बाटलीने मारहाण

पिंपरी | प्रतिनिधी

दारू पिताना अर्ध्यातून घरी निघालेल्या एका तरुणाच्या डोक्यात दारूची काचेची बाटली मारून जखमी केले. त्यानंतर मारहाण केली. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

प्रफुल्ल दत्तात्रय मुळे (वय 28, रा. पूर्णानगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोशन नलावडे (रा. चऱ्होली, ता. हवेली, जि. पुणे) आणि चंद्रकांत रंगनाथ मुळे (रा. पेरणे फाटा, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास आरोपी आणि फिर्यादी चऱ्होली येथील रोशन नलावडे यांच्या फ्लॅटमध्ये दारू पीत बसले होते. त्यावेळी फिर्यादी प्रफुल्ल यांनी घरगुती वादाचे टेन्शन असल्यामुळे आपण घरी जात असल्याचे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी रोशन नलावडे याने फिर्यादी यांच्या कपाळावर दारूची काचेची बाटली मारून जखमी केले. तसेच दोन्ही आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button