breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

मी दोन टर्मचा खासदार, कुठे बसायचं हे मला कळतं; श्रीकांत शिंदेंचा ‘त्या’ फोटोप्रकरणी राष्ट्रवादीवर पलटवार

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

मी दोन टर्मचा खासदार आहे. कुठे बसायचं, कुठे नाही हे मला चांगलंच समजतं. माझ्यावर राजकीय हेतुने आरोप केले जात आहेत, असा पलटवार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केलाय. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी आज एक फोटो ट्विट करत खळबळ उडवून दिली होती. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत श्रीकांत शिंदे कारभार चालवतात, श्रीकांत शिंदे सुपर सीएम आहेत, असा आरोप रविकांत वरपे यांनी केला होता.

राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी आज सोशल मीडियावर एक फोटो ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. श्रीकांत शिंदे हे एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसले असल्याचा आरोप करत हा फोटो ट्विट करण्यात आला होता. श्रीकांत शिंदे ज्या खुर्चीवर बसले होते, त्यामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा शासकीय फलक होता. त्यामुळे श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा दावा रविकांत वरपे यांनी केला. यावरून आज सकाळपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की, मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे पूत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे कारभार हाकतात की काय? श्रीकांत शिंदेवर झालेल्या या आरोपावर ते काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वाचं लक्ष असतानाच त्यांनी याबाबत खुलासा केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button