ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चाकण मधून एक ट्रक, एक ट्रॅक्टर चोरीला ; शहरात दुचाकी चोरीच्या तीन घटना

पिंपरी चिंचवड | चाकण परिसरातून एक ट्रक आणि एक ट्रॅक्टर चोरीला गेला आहे. तसेच, शहराच्या इतर भागातून तीन दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.ट्रक चोरीची घटना वाकी बुद्रुक, गारगोटे शिवार, खेड येथे घडली. याप्रकरणी भक्ती सुदाम गारगोटे (वय 40, रा. वाकी बुद्रुक, गारगोटे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोकळ्या जागेत उभा केलेला दहा लाख रुपयांचा ट्रक अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

कडाची वाडी, येथून 30 डिसेंबर रोजी ट्रॅक्टर चोरीला गेला आहे. याप्रकरणी रामदास मारुती कठाळे (वय 30, रा. कडाची वाडी, मुळगाव बीड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिल नारायण काकडे (रा. बीड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा विश्वास संपादन 50 हजार रुपये व पाच लाख रुपये किंमतीचा ट्रॅक्टर चोरुन नेला आहे.

तसेच, शहरातून भोसरी आणि पिंपरी येथून तीन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी जितेंद्र गणपत गोसावी (वय 27, रा. भोसरी) यांनी भोसरी, चंद्रकांत सुदाम फलके (वय 52, रा. चिखली) यांनी पिंपरी, महेंद्र यादव (वय 21, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button