ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात तेरा वर्षांच्या मुलीवर सात वर्षांपासून बलात्कार, मुली घरातही सुरक्षित नाहीत

पिंपरी चिंचवड | मुंबईतील साकीनाका येथील बलात्काराच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहे. त्यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी संतप्त मागणी राज्यभरातून करण्यात येत आहे. तर पुण्यातही 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल बारा जणांनी दोन दिवस बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.पुण्यातून बलात्काराची आणखी एक घटना उघडकीस आली असून 13 वर्षे वय असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तब्बल सात वर्षांपासून बलात्कार होत होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ही घटना असून सख्खा बापच या मुलीवर बलात्कार करत होता. 13 वर्ष वय असलेल्या या मुलीसोबत सख्खा बाप मागील सात वर्षापासून शरीर संबंध ठेवत होता. या मुलीच्या शाळेतील शिक्षकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हा संपूर्ण घृणास्पद प्रकार उघडकीस आला. नराधम बापाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button