पिंपरी / चिंचवड

हिंजवडीतील H2O हॉटेलमधील हुक्का पार्लरवर पोलीस आयुक्तांच्या पथकाने मारला छापा

पिंपरी | प्रतिनिधी

हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयरामनगर येथे असलेल्या H2O हॉटेलवर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये दोन लाख 39 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हॉटेल मालक तुषार प्रमोद सबलोक (वय 34, रा. मारुंजी, हिंजवडी), हॉटेल चालक जुनेद असगर अन्सारी (वय 34, रा. मिठानगर, कोंढवा, पुणे), बार टेंडर सुरेश गंगाजल राठोड (वय 26), कॅप्टर अशराफुल आसान शेख (वय 23), वेटर दिवाकर श्रीमहेश झा (वय 36), राखीबुल इसराफुल शेख (वय 22), छोटन लालमोहम्मद शेख वय 25, चौघे रा. जयरामनगर, हुलावळे चाळ, हिंजवडी) यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हॉटेलमध्ये गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 61 इसमांवर प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2022 रोजी H2O हॉटेलमध्ये जुनेद अन्सारी व तुषार सबलोक यांनी हॉटेलमधील टेरेसवर विनापरवाना अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लोखंडी पत्र्याचे शेड मारुन टेबल खुर्च्या लावून तिथे लोकांची गर्दी जमवली. लोकांना प्रतिबंधीत तंबाखूजन्य हुक्का पिणेस जागा उपलब्ध करुन हुक्का विक्री केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर खुद्द पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्यांच्या पथकासोबत मध्यरात्री हॉटेलवर छापा टाकला.

आरोपी जुनेद आणि तुषार यांनी जमावबंदी आणि कोरोना साथीच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करून हॉटेल सुरू ठेवले आणि ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पुरवला असल्याचे या छाप्या दरम्यान निदर्शनास आले. पोलिसांनी रोख रक्कम, हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट आणि इतर साहित्य असा एकूण दोन लाख 39 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सामाजिक सुरक्षा पथकातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहाय्यक निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार विजय कांबळे, किशोर पढेर, सुनिल शिरसाट, संतोष बर्गे, स्वप्निल खेतले भगवंता मुठे, अमोल साडेकर, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, संगिता जाधव, अतुल लाखंडे, योगेश तिडके, सोनाली माने, अमोल शिंदे, सुमित डमाळ यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button