breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

पारनेरमध्ये दोनशे खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारणार- आमदार नीलेश लंके

  • हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार लंके यांचा संकल्प

पारनेर |

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील आरोग्यसेवेच्या मर्यादा, उणिवा स्पष्ट झाल्या आहेत. आरोग्य सेवेतील उणिवा दूर करण्यासाठी, वंचित घटकांना उच्च दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यात २०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याचा संकल्प आमदार नीलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त केला आहे. तालुक्याच्या उत्तर भागातील आदिवासी बहुल भागात, नगर-कल्याण रस्त्यावर रुग्णालय उभारण्याचा आमदार लंके यांचा मानस असल्याचे लंके यांचे निकटवर्तीय, वकील राहुल झावरे यांनी सांगितले. या रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा पुरवण्यात येणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक हजारे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त आमदार लंके यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी भाळवणी येथील करोना उपचार केंद्राच्या कामाची तसेच तालुक्यात सध्या सुरू असलेल्या विकास कामांची माहिती आमदार लंके यांनी हजारे यांना दिली.

करोना संसर्गात वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलांना, तसेच संसर्गात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे आमदार लंके यांनी सांगितले. हजारे म्हणाले, की गाव, समाज आणि देशासाठी जगणारी व मरणारी माणसे खऱ्या अर्थाने जगतात. सेवेचा आनंद हा काही वेगळाच असतो. तो प्रत्येकाच्या जीवनात येत नाही. मात्र आमदार लंके यांनी उभ्या केलेल्या कामामुळे ते सेवेतून मिळणारा आनंद अनुभवत आहेत. शुद्ध आचरण, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, जीवनात त्याग आणि अपमान सहन करण्याची शक्ती या पाच तत्त्वांवर आमदार लंके यांचा विश्वास असल्याचे त्यांच्या कामातून जाणवते. आमदार लंके यांनी करोना संकटकाळात केलेले काम कौतुकास्पद असल्याचे हजारे म्हणाले. या वेळी वकील राहुल झावरे, सरपंच सुभाष गाजरे, माजी सरंपच जयसिंग मापारी, नानाभाऊ मापारी, दत्ता आवारी, राहुल खामकर, अभयसिंह नांगरे, अमोल झेंडे, संदीप चौधरी, अशोक घुले, सत्यम निमसे उपस्थित होते.

  • विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालुक्यातील निघोज येथे अद्ययावत अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. या अभ्यासिकेसाठी जिल्हा नियोजन मंडळाने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील १६ गावांतील विकास कामांसाठी विविध लेखाशीर्षांतर्गत चार कोटी असा एकूण पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

– नीलेश लंके, आमदार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button