TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत कचऱ्यापासून साकारली फ्लेमिंगोची प्रतिकृती

मुंबई : पर्यावरणप्रेमी आणि पर्यावरणविषयक संस्थांनी कांदळवन, खाडीची स्वच्छता आणि संवर्धनाची मोहीम हाती घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून दर आठवड्याला कांदळवन, खाडीतील कचरा गोळा करण्यात येत आहे. कांदळवन-खाडीतून मोठ्या प्रमाणावर काढण्यात आलेल्या कचऱ्यापासून फ्लेमिंगोची मोठी प्रतिकृती साकारून पर्यावरणप्रेमींनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. कचऱ्यातून जमा करण्यात आलेले प्लास्टिक, थर्माकोल आदींचा वापर करून ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या मोहिमेतून पर्यावरणाच्या संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

‘एन्व्हार्नमेंट लाईफ’ आणि अन्य पर्यावरणप्रेमी संस्थांनी आठवड्यातून एका दिवस कांदळवन, खाडी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत कांदळवन, खाडीतून दर आठवड्यातून एका दिवसात साधारण साधारण १०० किलोहून अधिक कचरा बाहेर काढण्यात येत आहे. या कचऱ्यात पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक घटक असल्याचे निदर्शनास आले आहे. या कचऱ्यात प्लास्टिक, थर्माकोल, काच, रबर आदींचा समावेश आहे. थर्माकोलचे डबे, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, अन्य वस्तू, काचेच्या बाटल्या आणि विविध वस्तू, रबरी चप्पल आणि पट्टे, चिनी मातीच्या मूर्ती कचऱ्यात सापडत आहेत. मोठ्या प्रमाणावर गोळा होणाऱ्या या कचऱ्याचे करायचे काय असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना पडला होता. अखेर या कचऱ्यापासून फ्लेमिंगोची मोठी प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

कचऱ्यातील रबरी चप्पल, थर्माकोल, प्लास्टिकच्या वाटल्यांचा वापर करून प्लोमिंगोची ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे. देशातील जैविविधतेचे संवर्धन आणि फ्लेमिंगोच्या अधिवासाचे जतन व्हावे या उद्देशाने फ्लेमिंगो प्रतिकृती तयार करण्यात आली आहे, असे ‘एन्व्हार्नमेंट लाईफ’चे संस्थापक धर्मेश बरई यांनी सांगितले. कांदळवन, खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असून नागरिकांनी पर्यावरणाविषयी सजग व्हायला व्हावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button