ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वकिलाकडे मागितली वीस लाखांची खंडणी

पिंपरी चिंचवड | तिघांनी मिळून वकील असलेल्या एका तरुणाकडे वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. हा प्रकार मे 2019 ते 9 नोव्हेंबर 2021 या कालावधीत च-होली आणि आळंदी परिसरात घडला.किसन तापकीर, सतीश तळेकर, लक्ष्मीकांत रासकर (तिघे रा. वडमुखवाडी, च-होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी कैलास विनायक तोंडे (वय 29, रा. वडमुखवाडी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वकील असून ते सन 2016 पासून च-होली परिसरात फ्लॅट घेऊन विक्री करण्याचा व्यवसाय करतात. सन 2017 मध्ये फिर्यादी यांची लक्ष्मीकांत रासकर यांच्यामुळे किसन ज्ञानोबा तापकीर यांच्याशी ओळख झाली. त्यावेळी फिर्यादी यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरू होतात. परंतु सन 2019 मध्ये किसन तापकीर यांच्याशी किरकोळ कारणावरून फिर्यादी यांचा वाद झाला. त्यानंतर प्रकाश म्हस्के यांच्या प्लॉटचा व्यवहार करत असताना त्यांनी पेपर नोटीस देण्यास सांगितली. फिर्यादी यांनी ऑफिसच्या सहका-यामार्फत पेपर नोटीस दिली- फ्लॅटच्या उद्घाटनाला आरोपींना बोलावले नाही. त्याचा राग मनात धरून किसन तापकीर यांनी फिर्यादी यांना पैशांसाठी टॉर्चर करण्यास सुरुवात केली.

फिर्यादी यांना भरपूर कामे करून भरपूर मोबदला मिळाला. फिर्यादी यांनी त्यांच्या मित्रांसोबत पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला. त्यामुळे आरोपी किसन तापकीर यांना पैसे मिळणे बंद झाले होते. त्यावरून ते फिर्यादी यांना टॉर्चर करत होते. 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आरोपी किसन तापकीर यांनी फिर्यादी यांना फोन करून आळंदी देहूफाटा या ठिकाणी एका हॉटेलवर बोलावले.

हॉटेलमधील एका खोलीत आरोपी दारू पीत असताना फिर्यादी तिथे गेले. आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच हाताने मारहाण केली. तू ऑफिस कसे उघडतो अशी धमकी दिली. पाच गुंठे जागा माझ्या नावावर कर नाहीतर तुला व्यवसाय करू देणार नाही, असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले. फिर्यादी यांनी पैसे देण्यास होकार दिल्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना एका तासानंतर हॉटेलच्या रूममधून सोडून दिले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button