ताज्या घडामोडीमुंबई

घाटकोपरच्या असल्फा भागातील कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

मुंबई | घाटकोपर येथील असल्फा सुंदर बाग येथील डिसिलव्हा कंपाउंडमध्ये एका कपड्याच्या गोडाउनला भीषण लागली. आज सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, सध्या कारखान्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र, इतर घरांना झळ बसल्याने आग फैलावण्याचा धोका आहे.मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर परिसरात एक कपड्याचे गोडाऊन आहे. याच गोदामाला आज सकाळी अचानकपणे आग लागली आहे. कपड्यांचा गोदाम असल्यामुळे त्याला काही क्षणात आग लागली. ही आग आता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. आग नेमकी का लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आकाशातील धुराचे लोट पाहून गोदामाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी अग्निशमन दलाला तात्काळ कळवले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. या ठिकाणी इंजेक्शन बनवण्याचे काम सुरू होते. या परिसरात मोठ्या प्रमाणवर नागरी वस्ती आहे व विविध छोट्या कंपन्या देखील आहेत. त्यामुळे अधिक सावधगिरी बाळगली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button