breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भिवंडीत फर्निचरच्या गोदामाला भीषण आग
भिवंडी– भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरूच असताना वळ गावच्या हद्दीतील उर्बान फर्निचरच्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या आगीत पहिल्या मजल्यावर असलेले गोदाम जळून खाक झाले असून त्यामधील लाखो रुपयांचे फर्निचरचे साहित्यही आगीच्या भक्षस्थानी पडले.
वळ गावातील उर्बान फर्निचरच्या गोदामाच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली आणि या गोदामात मोठ्या प्रमाणात फर्निचर असल्यानेही आग आणखी पसरली. या गोदामातून धुराचे लोण आकाशात सर्वत्र पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.अथक प्रयत्न करून जवानानी आगीवर पाण्याचा मारा केला आणि आगीवर नियंत्रण मिळवले.आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून सुदेवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.