breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयाला भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू

मुंबई – भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर जवळपास ७० कोरोना रुग्णांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, आग अद्याप आटोक्यात आलेली नसून अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

वाचा :-काळजी घ्या! मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाने गाठला आजवरचा उच्चांक

पोलीस अधिकारी प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आगीमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रात्री १२.३० वाजता रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या २२ ते २३ गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत.’ तसेच ‘७३ पैकी ३० रुग्णांना मुलुंडच्या जम्बो सेंटरमध्ये हलवण्यात आले असून तिघांना फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय इतर रुग्ण रुग्णालयाच्या इतर वॉर्डमध्ये दाखल आहेत’, अशी माहिती एका वरिष्ठ डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरदेखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. ‘पहिल्यांदाच मी मॉलमध्ये रुग्णालय पाहत आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. सात रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. ७० रुग्णांना इतर रुग्णालयात नेण्यात आले आहे. आगीचे कारण जाणून घेण्यासाठी तपास केला जाईल’, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button