TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भारतमाता चौकात श्री नागेश्वर महाराजांचे भव्य प्रवेशद्वार उभारावे

नगरसेवक वसंत बोराटे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पिंपरी प्रतिनिधी

देहू-आळंदी रस्त्यावरील भारत माता चौकात श्री नागेश्वर महाराजांचे भव्य प्रवेशद्वार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारावे, अशी मागणी नगरसेवक वसंत बोराटे यांनी केली आहे. नगरसेवक वसंत बोराटे यांनी याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देहू आळंदी परिसरात मोशी गाव वसले आहे. मोशी गावाला सांस्कृतिक वारसा आहे. गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराज यांचे भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत.

पिंपरी चिंचवड शहराची हद्द मोशीतील इंद्रायणी नदी पर्यंत आहे. देहू आळंदीकडे जाणारा वारकरी संप्रदाय व पुणे-नाशिक महामार्गावर ये-जा करणार्‍या नागरिकांना भव्य प्रवेशद्वार दिसावे. महापालिकेच्या माध्यमातून श्री नागेश्वर महाराजांचे प्रवेशद्वार देहू-आळंदी रस्त्यावरील भारत माता चौकात उभे करावे, अशी मागणी सर्व गावकऱ्यांकडून केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button