breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजकार्याला वाहून घेणारी पीढी घडवली पाहिजे – माजी आमदार विलास लांडे

  • राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिका-यांना केले मार्गदर्शन
  • पुणे विभागीय अध्यक्षा संध्या सोनवणे यांनी लांडे यांची घेतली भेट

पिंपरी / महाईन्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसची पुरोगामी विचारधारा महाविद्यालयीन दशेत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी पुढाकार घेतला आहे. यावर सांगोपांग चर्चा विनिमय करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा संध्या सोनवणे यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी माजी आमदार लांडे यांनी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या.

भोसरीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजचा स्टाफ आणि नगरसेवक विक्रांत लांडे आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, माजी आमदार लांडे आणि नगरसेवक विक्रांत लांडे यांनी अध्यक्षा सोनवणे यांचे स्वागत केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भेडसावणा-या समस्या, संस्थाचालकांकडून विद्यार्थ्यांप्रती असहकार्याची भावना, विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील चढउतार, मुलींच्या उच्च शिक्षणाबाबत पालकांची अनास्था अशा असंख्य प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

नगरसेवक विक्रांत लांडे म्हणाले, शालेय शिक्षणाबरोबरच समाजाला दिशा देणारी राजकीय विचारधारा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजविण्याची गरज आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना धार्मिक अमिषाला बळी पाडून भावनीकतेच्या पाषात गुंडाळणा-या राजकीय पक्षाला फाटा देऊन पुरोगामी विचारधारा जपणा-या राजकीय पक्षाची तत्वे समजवून सांगण्याची गरज आज निर्माण झाली आहे. प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करून स्वतःच्या पायावर उभे करण्यापर्यंत आपण पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी संघटन कौशल्य निर्माण केलं पाहिजे. भविष्यात याचा पक्षवाढीसाठी निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

माजी आमदार लांडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक जवळ आली आहे. महापालिकेवर आपल्याला एकहाती सत्ता आणायची आहे. त्यादृष्टीने आपल्याला काम करायचे आहे. विद्यार्थी दशेतील तरुणांचे संघटन वाढवून त्यांच्या माध्यमातून समाजकार्याला वाहून घेणारी पिढी घडवली पाहिजे. हे करताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवारसाहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. पवारसाहेबांचे विचार तळागाळात रुजविण्यासाठी विद्यार्थी संघटना चांगले काम करू शकेल. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक अजित गव्हाणे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्यासोबत आपण सर्वजण एकत्र येऊन काम केले पाहिजे.

अध्यक्षा सोनवणे म्हणाल्या की, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची संघटन बांधणी करण्यासाठी आपला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव फायदेशीर ठरणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये संघटन मजबूत करण्यासाठी नवीन पदाधिका-यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्याचे कार्य करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button