breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग

पुणे – काही महिन्यांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठ फॅशन स्ट्रिटला भीषण आग लागली होती. त्यानंतर काही दिवसांपुर्वीच मुळशी तालुक्यातील सॅनिटायझर उत्पादक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यात आता गुरुवारी मध्यरात्री पुण्याच्या मुख्य भागात असलेल्या ब्रिटिशकालीन महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग लागली आहे.

महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील पूर्व भागात असलेल्या लाकडी भागाला ही आग लागली आहे. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 3 गाड्या आणि पाण्याचा 1 टँकर घटनास्थळी दाखल झाला आहे. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

महात्मा फुले मंडई ही ब्रिटिशकालीन वास्तू असून आतील बहुतांश भाग हा लाकडी आहे. या मंडईच्या आतील भागाच्या छताला रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाला मिळाली. आग इतकी भीषण होती की अग्निशामक दलाच्या गाड्या पोहचेपर्यंत आतील सर्व भाग जळून खाक झाला होता.

दरम्यान, सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशामक दलाला यश आलं आहे. अग्निशामन दलाच्या तीन बंबांनी ही आग आटोक्यात आणली कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. आगीचं कारण, इमारतीचं नुकसान किती झालं हे आत्ता लगेच सांगता येणार नाही, असं अग्निशमन दलाचे अधिकारी प्रदीप खेडेकर यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button