breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

फिलाडेल्फियात तीन मजली इमारतीला भीषण आग, १३ जणांचा जळून मृत्यू

न्यूयॉर्क | टीम ऑनलाइन
पूर्व अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात स्थानिक वेळेनुसार काल बुधवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली. या दुर्घटनेत ७ मुलांसह १३ जणांचा मृत्यू झाला. फिलाडेल्फियाच्या डाउनटाउनमधील एन २३व्या स्ट्रीटच्या ८०० ब्लॉकवरील तीन मजली इमारतीत ही भीषण आग लागली होती.

फिलाडेल्फिया अग्निशमन विभागाचे उपायुक्त क्रेग मर्फी यांनी सांगितले की, आग विझली असतानाही इमारतीच्या आतून जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू होते. त्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. मृतांव्यतिरिक्त अन्य दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग लागलेली ही इमारत फिलाडेल्फिया सार्वजनिक गृहनिर्माण प्राधिकरणाची आहे. इमारतीला आग लागल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होण्याचे कारण तेथे बसवण्यात आलेल्या स्मोक डिटेक्टरमध्ये बिघाड झाल्याचे मानले जात आहे, त्यामुळे इमारतीत उपस्थित लोकांना वेळेत आगीची सूचना मिळू शकली नाही. इमारतीत चार स्मोक डिटेक्टर असून चारही खराब झाल्याचे आढळून आल्याचे उपायुक्त मर्फी यांनी सांगितले. आगीची माहिती मिळताच स्थानिक वेळेनुसार सकाळी ६.४० वाजता अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले व ५० मिनिटांत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत ७ मुलांसह १३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. बहुतेक मृत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकले होते. दरम्यान, या आगीतून आठ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button