ताज्या घडामोडीमुंबई

मद्यपी चालकांवर कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला; डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला…

ठाण्यामधील माजीवडा येथे मद्यपी चालकांवर कारवाई करत असताना शुक्रवारी रात्री अनिल गुप्ता (३६) याने पोलीस शिपाई नागनाथ कांदे यांच्या डोक्यात चक्क सिमेंटचा गट्टू घातला. या घटनेत कांदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. रात्री उशीरापर्यंत या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

नागनाथ कांदे हे वाहतूक शाखेतील कापूरबावडी पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत. धूलिवंदन निमित्ताने वाहतूक नियंमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी त्यांची नेमणूक माजीवडा येथे करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री याच भागातून भागीरथ चव्हाण आणि त्याचा मित्र अनिल गुप्ता हे दोघेही दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी कांदे यांनी त्यांची दुचाकी अडवून कारवाईस सुरूवात केली. आमच्यावर कारवाई करू नका, असे दोघेही म्हणत होते. परंतु कांदे यांनी त्यांचे म्हणणे अमान्य केल्याने संतप्त अनिलने त्यांच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला.

या घटनेत कांदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button