TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मुलींच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या ओम प्रतिष्ठानचा माहितीपट प्रदर्शित

पिंपरी | शनिवारी ओम प्रतिष्ठान संचलित विद्यांगण शाळेत विद्यादान योजनेच्या एका लाभार्थी विद्यार्थिनीला कल्यानी कुलकर्णी यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यादरम्यान संस्थेच्या कार्याचा सखोल मागोवा घेणारा लघु माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या सौ. सारिका इंगोले, श्री मनजीत सिंग बिलक, श्री पराग सर, सौ. सोनल पाटील (अध्यक्षा विद्यादान योजना) , सौ. विद्या महाजन ( सेक्रेटरी विद्यादान योजना ) संस्थापक अध्यक्षा सौ. वनिता सावंत, माहितीपटाचे लेखक दिग्दर्शक हरिष तरुण, एडिटर समृद्धी कुचिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

A documentary on Om Pratishthan, which strives for girls' education, is released
माहितीपट प्रदर्शित झाल्यानंतर पराग सर यांनी “समाजातील असंख्य मुलींना केवळ अर्थिकच नाही तर मानसिक आधाराची सुद्धा गरज आहे, ओम प्रतिष्ठान यासाठी अविरतपणे झगडत असून अशा संस्थांना मदतीचा हातभार लावण्यासाठी लोकांनी पुढे यावे, मुलींना शिकावण्यासारखे मोठे कार्य नाही” असे मत व्यक्त केले.
आजही अनेक मुलींना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो ही नवी गोष्ट नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button