breaking-newsEnglishTOP NewsUncategorizedक्रिडाताज्या घडामोडीदेश-विदेश

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत रोहित आणि विराटला इतिहास रचण्याची संधी

A chance for Rohit and Virat to create history in the India-Australia series

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत रोहित आणि विराटला इतिहास रचण्याची संधी

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना आज (२० सप्टेंबर) रोजी होणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण २४ सामने झाले आहेत, ज्यामध्ये भारताने १३ सामने जिंकले आहेत आणि ऑस्ट्रेलियन संघाने ९ सामने जिंकले आहेत. यासोबतच दोन सामन्यांमध्ये निकाल लागला नाही. या मालिकेत असे काही रेकॉर्ड केले जाऊ शकतात जे चाहत्यांना आश्चर्यचकित करतील.-‘==——————————-

रोहितला हवे दोन षटकार
भारताचा कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्माला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम खुणावतो आहे. यासाठी त्याला दोन षटकारांची आवश्यकता आहे. आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०द्वारे रोहितला ही संधी मिळेल. भारताचा कर्णधार यंदाच्या मोसमात छान फलंदाजी करत आहे. त्याने १७ लढतींमध्ये २६.४३ची सरासरी आणि १४३.३८च्या स्ट्राइक रेटने ४२३ धावा तडकावल्या आहेत. या १७ लढतींमध्ये रोहितने २१ षटकारांची आतषबाजीही केली आहे. सध्या मार्टिन गप्टील १७२ षटकारांसह अव्वल क्रमांकावर असून, ख्रिस गेल १२४ षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हिट मॅन ऑस्ट्रेलियाविरुद्ध खास रेकॉर्ड करणार
भारताचा ‘हिट मॅन’ रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत धोनीला मागे टाकण्याची संधी असेल. रोहित जर ३० धावा करू शकला तर तो धोनीला मात देऊ शकेणार आहे, भारतीय कर्णधाराने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७० डावांत २९३४ धावा केल्या आहेत, तर धोनीने ९६ डावांत २९६३ धावा केल्या होत्या.

केएल राहुललाही संधी
केएल राहुलला आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे. जर राहुल ३७ धावा करण्यात यशस्वी ठरला तर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २००० धावा करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज ठरेल. रोहित आणि विराट कोहलीने याआधी ही कामगिरी केली आहे.

विराटला हव्यात २०७ धावा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्याची संधी विराटला आहे. यासाठी विराटला २०७ धावांची गरज आहे. जगातील फलंदाजांच्या यादीत तो सहाव्य़ा क्रमांकावर येईल. सध्या या यादीत विराट सातवा आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांच्या जागतिक यादीत सहाव्या क्रमांकावर राहुल द्रविड असून, भारतीयांच्या यादीत द्रविड सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

विराटची आंतरराष्ट्रीय कामगिरी
आंतरराष्ट्रीय लढती : ४६८
आंतरराष्ट्रीय धावा : २४,००२
सरासरी : ५३.८१
शतके : ७१
अर्धशतके : १२४
सर्वोच्च धावा : २५४*

दिग्गजांचे टी २०मधील विक्रम
राहुल द्रविड यांनी ५०९ आंतरराष्ट्रीय लढतींमध्ये ४५.४१च्या सरासरीने २४,२०८ धावा फटकावल्या आहेत. द्रविड यांच्या नावे ४८ आंतरराष्ट्रीय शतके आणि १४६ अर्धशतकांचीही नोंद आहे. त्याची सर्वोच्च खेळी २७० धावांची आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. सचिन यांनी ६६४ लढतींमध्ये ४८.५२च्या सरासरीने ३४,३५७ धावांचा पाऊस पाडला असून, यात १०० शतके आणि १६४ अर्धशतकांचा समावेश आहे. जागतिक यादीत कुमार संगकारा (श्रीलंका, २८,०१६), रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया, २७,४८३), माहेला जयवर्धने (श्रीलंका, २५, ९५७) आणि जॅक कॅलिस (द. आफ्रिका, २५,५३४) यांचाही समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button