पिंपरी / चिंचवड

पत्नीला विश्वासात न घेता घरावर कर्ज काढल्याने पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

पती-पत्नी अशा दोघांच्या नावावर फ्लॅट असताना पत्नीला विश्वासात न घेता फ्लॅटचे एनओसी देऊन तिथे कंपनी सुरु असल्याचे कागदोपत्री भासवले. त्यापोटी बँकेतून 50 लाख रुपयांचे कर्ज घेतले. बँकेने देखील पडताळणी न करता कर्ज मंजूर केले. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 ऑगस्ट 2016 पासून 12 मार्च 2022 या कालावधीत लक्षदीप पॅलेस, पिंपळे सौदागर येथे घडली.

संदीप सिंह सुलतान सिंह बिस्ट (रा. श्रीनगर गढवाल), transmonk india private limited या कंपनीचे संचालक मधुर पांडे, कुमारी गुरुंग, मनीष पांडे, सुरेंद्र सिंग, राहुल गुरुंग, idfc first bank limited येथील कर्ज विभागात काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुमन ख्यालिदत्त जोशी (वय 40, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप सिंह आणि फिर्यादी हे पती पत्नी आहेत. फिर्यादी राहत असलेला फ्लॅट फिर्यादी आणि आरोपी दोघांच्या नावावर आहे. तरीही संदीप सिंह याने तो फ्लॅट एकट्याच्या मालकीचा असल्याचे भासवून transmonk india private limited ही कंपनी सुरु करण्यासाठी 9 ऑगस्ट 2016 रोजी ना हरकत प्रमाणपत्र दिले. कंपनीचे संचालक मधुर पांडे, कुमारी गुरुंग, मनीष पांडे, सुरेंद्र सिंग यांच्यासोबत मिळून transmonk india private limited ही कंपनी फिर्यादी राहत असलेल्या फ्लॅटमध्ये सुरु असल्याचे भासवून idfc बँकेकडून 50 लाख रुपयांचे कर्ज काढले. बँकेने देखील योग्य पडताळणी न करता कर्ज मंजूर केले. linkedin या वेबसाईटवर, फेसबुकवर राहुल गुरुंग हा या कंपनीचा संचालक असल्याचे आरोपींनी भासवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button