पिंपरी / चिंचवड

महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

एका व्यक्तीने महिलेचा पाठलाग केला. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून तिला शिवीगाळ केली. महिलेने व्यक्तीसोबत बोलायचे नसल्याचे सांगितल्याने व्यक्तीने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजता संत तुकाराम नगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहासमोर घडली.

संदीप बामगुडे (रा. नेरे आंबेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी आरोपी फिर्यादी महिलेच्या मागे मागे फिरत संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे सभागृहापर्यंत आला. फिर्यादींसोबत बोलायचे असल्याचे आरोपीने सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी आरोपी सोबत बोलायचे नाही म्हणत त्याला निघून जाण्यास सांगितले.

त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button