breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह ५०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर | प्रतिनिधी 
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजयी उमेदवार राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि त्यांच्या चारशे ते पाचशे कार्यकर्त्यावर कोरोना नियमांचा भंग करून जंगी मिरवणूक काढल्याबद्दल जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल विजय पाटील यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.

९ जानेवारी रोजी जयसिंगपूर येथे क्रांती चौक ते गल्ली क्रमांक सहा दरम्यान विजयी मिरवणूक काढली त्यात जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण केली. राज्यात कोरोनामुळे निर्बंध लागू केले गेलेले असतानाही खुद्द मंत्री यड्रावकर आणि त्यांचे बंधू संजय या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

या मिरवणुकीचे फोटो सोशल मीडियावर व्हाय़रल झाल्यानंतर लोकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. जनतेला गर्दी करु नका असं आवाहन करणाऱ्या सरकारमधले मंत्रीच जर अशी गर्दी करुन मिरवणुका काढणार असतील तर काय अर्थ आहे असा सवाल विचारला जात होता. यानंतर पोलिसांनी दखल घेत या प्रकरणात मंत्री यड्रावकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा बँकेच्या शिरोळ सेवा संस्था गटात झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत मंत्री यड्रावकर यांनी शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांचा पराभव केला.

शिरोळ तालुका विकास सेवा संस्था गट मध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक जिल्ह्यात ठरली. कारण या निवडणुकीमध्ये शिरूर तालुक्यातील माजी खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांनी गणपतराव पाटील यांच्या पाठीमागे आपली ताकद लावली होती. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना विरोध करत संपूर्ण जिल्ह्याचे या तालुक्याच्या निवडीकडे लक्ष लागून राहिलं होतं. यामध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना ९८ तर गणपत पाटील यांना ५१ मत मिळाल्यामुळे राजेंद्र पाटील यांनी विजय संपादन केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button