breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी घट

नवी दिल्ली – पेट्रोल, डिझेलच्या किंमतींनी गेल्या काही महिन्यांपासून कहर मांडला होता. दर दिवशी जवळपास ३० ते ३५ पैशांनी इंधन महागत होते. अशातच मोदी सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला काहीसा दिलासा देत एक्साईज ड्युटीमध्ये पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची कपात केली. आज, लक्ष्मीपूजनापासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यानुसार आज मुंबईतील एक लिटर पेट्रोलची किंमत 109.98 रुपये, तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रतिलिटर इतकी आहे. त्याचबरोबर दिल्लीत इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर प्रतिलिटर 6.07 रुपयांनी घट होऊन दर 103.97 रुपयांवर आलेआहेत. काल ही किंमत 110.04 रुपये होती. तर डिझेलच्या दरांत 11.75 रुपयांची घट होऊन डिझेल 86.67 रुपये प्रतिलिटरपर्यंत आले आहे. काल याची किंमत प्रतिलिटर 98.42 रुपये इतकी होती.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पेट्रोलच्या किंमतींमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली होती. मंगळवारपर्यंत हे दरवाढीचे सत्र सुरूच होते. मध्ये काही दिवस या दरवाढीला स्थिरता मिळाली. मात्र गेल्या 26 दिवसांत पेट्रोलची किंमत 8.15 रुपये प्रतिलिटरने वाढली होती. दरम्यान, केंद्राने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्यांनीही पेट्रोल-डिझेलवरील वॅट कमी करावा असे आवाहन अर्थ मंत्रालयाद्वारे करण्यात आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button