breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

साखरेच्या दरात मोठी घसरण; निर्यातदारांचे एक पाऊल मागे

कोल्हापूर – जागतिक बाजारामध्ये साखरेचे दर झपाट्याने उतरू लागल्याने भारतीय साखर उद्योगाने तूर्त साखर निर्यातीच्या आघाडीवर एक पाऊल मागे घेतले आहे. देशांतर्गत बाजारामध्ये साखरेचे भाव चांगले मिळू लागल्याने सध्या तरी साखर उद्योगाचे लक्ष भारतीय बाजारपेठेवर राहील, असे चित्र असून जागतिक बाजारात साखरेची स्थिती कायम राहिली, तर आगामी काळात साखर निर्यातीसाठी अनुदानाची मदत घ्यावी लागणार आहे.

यंदा साखरेच्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर जागतिक बाजारात साखरेचे दर टिपेला पोहोचले होते. कच्च्या साखरेला प्रतिपाऊंड २१ सेंट म्हणजेच प्रतिक्विंटल सुमारे ३४०० रुपये भाव मिळाल्याने निर्यातीकडे उद्योगाचा कल होता. केंद्र सरकारच्या अनुदानाशिवाय साखर निर्यात होऊ शकते,असे यंदा प्रथमच घडले. या स्थितीला ब्राझीलमधील उत्पादनातील घट, थायलंडमधील दुष्काळ कारणीभूत ठरला.या संधीचा लाभ उठवत भारतीय साखर उद्योगाने पहिल्या दोन महिन्यांतच ३५ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचे करार केले. यात महाराष्ट्र व कर्नाटकातील साखरेच्या निर्यात कराराचे प्रमाण लक्षणीय आहे. तथापि, गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात साखरेचे भाव घसरले.

सध्या कच्ची साखर १८ सेंट प्रतिपाऊंडपर्यंत म्हणजेच प्रतिक्विंटल ३१०० रुपयांनी खाली आली. याउलट देशांतर्गत बाजारात साखरेला चांगला दर आहे. त्यामुळे सध्या तरी कारखान्यांचे लक्ष देशांतर्गत बाजारपेठेवर असेल. नोव्हेंबरअखेर देशात ४१६ साखर कारखान्यांनी केलेल्या गाळपात ४७.२१ लाख मेट्रिक टन साखर उत्पादित झाल्याचे भारतीय साखर कारखाने संघाने (इस्मा)आपल्या परिपत्रकात म्हटले आहे.गेल्यावर्षीवर्षी याच काळात हे उत्पादन ४३.२ लाख मेट्रिक टन इतके होते. यंदाचे उत्पादन ४.१९ लाख मेट्रिक टनांनी अधिक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button