breaking-newsTOP NewsUncategorizedमुंबई

पोलीस मारहाणप्रकरणी ‘असं’ म्हणणं दुर्दैवी, शिवसेना आमदारांचा राम कदम यांना टोला; युवासेनेचं आज मुंबईत आंदोलन

राम कदम यांनी आरोपींना सोडवण्यासाठी पोलिसांना फोन करण्याचा प्रकार समोर आल्यानंतर आज युवासेनेने मुंबईत आंदोलन करण्याची तयारी केली आहे. युवासेना मुंबईतील विविध ठिकाणी दुपारी अडीच वाजता आंदोलन करणार आहे.

मुंबईतील पवई पोलीस स्टेशनचे कर्मचारी नितीन खैरमोडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी अमानुष मारहाण केली. दिपू तिवारी, सचिन तिवारी आणि आयुषा राजभर अशी आरोपींची नावं आहे. या घटनेत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे यांना दुखापत झाली आहे. पोलिसांनी कारवाई करुन आरोपींना अटक केली. मात्र काही तासांच्या आत आमदार राम कदम यांनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना फोन करुन आरोपींना सोडण्याची विनंती केली. ही बाब समजताच शिवसेनेने राम कदम यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. राम कदम यांच्या निषेधार्थ युवासेना आज मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करणार आहे.

शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, “कोविड काळात पोलिसांनी रस्त्यावर उतरुन काम केलं. यात कितीतरी पोलीस शहीद झाले. असं काम करणाऱ्या पोलिसांना मारहाण केली जाते. मारहाण करणाऱ्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हे कृत्य निषेध करण्यासारखं आहे. मंत्री, आमदार, पदाधिकाऱ्यांचं संरक्षण पोलीसच करतात आणि त्यांना मारहाण करणाऱ्यांना सोडा असं म्हणणं हे दुर्दैवी आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button