ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे चेअरमन संतोष बारणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पिंपरी- चिंचवड | महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजक तथा महाराष्ट्र किकबॉक्सिंग असोसिएशनचे चेअरमन संतोष बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या किकबॉक्सिंग स्पर्धा २०२६ उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेला आमदार महेशदादा लांडगे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार लांडगे यांनी क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने सकारात्मक भूमिका घेत असल्याचे अधोरेखित झाले. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेतील खेळाडू, प्रशिक्षक आणि आयोजकांना मोठी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी संतोष बारणे म्हणाले की, “आज महाराष्ट्रात सुमारे २५ ते ३० हजार खेळाडू किकबॉक्सिंग या खेळाशी जोडले गेले आहेत. या खेळाच्या विकासासाठी आमदार महेशदादा लांडगे यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून, भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्याने किकबॉक्सिंगला अधिक बळ मिळेल, याची मला पूर्ण खात्री आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाला अधिक मोठी ओळख मिळवून देण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान राहील, असा मला विश्वास आहे.

हेही वाचा

चिखली-कुदळवाडीत पहाटे ३ वाजता कारवाई; पाच धार्मिक स्थळे जमीनदोस्त, नागरिकांमध्ये संतापाची लाट!

तसेच महाराष्ट्र किकबॉक्सिंग परिवारावर दाखवलेल्या प्रेम, आपुलकी आणि विश्वासाबद्दल बारणे यांनी आमदार लांडगे यांचे मनःपूर्वक आभार मानले. “चेअरमन म्हणून क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांच्यासोबत कार्य करण्याची संधी मिळत असल्याचा मला अभिमान आहे,” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

स्पर्धेत राज्यातील विविध भागांतील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. क्रीडाप्रेमी वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे किकबॉक्सिंगच्या प्रसाराला आणि नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button