मावळातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थस्थळांचा दर्जा

पिंपरी : मावळ तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या ५ तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्ग तीर्थस्थळांचा दर्जा देण्यात आला असून या पाचही मंदिर परिसरात विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
यामध्ये श्री कोंडेश्वर देवस्थान जांभवली, श्री फिरंगाई माता मंदिर नाणोली तर्फे चाकण, श्री चौराई माता मंदिर सोमाटणे, श्री संगमेश्वर देवस्थान वडिवळे, श्री वाघजाई माता मंदिर खंडाळा या तीर्थस्थळांना समावेश करण्यात आला आहे.
श्री कोंडेश्वर मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालय बांधणे ४० लक्ष, वाहनतळ २० लक्ष, पाणी पुरवठा योजना करणे २० लक्ष, जांभवली ते कोंडेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे ५० लक्ष, वाडीवळे येथील श्री संगमेश्वर मंदिर परिसरात भक्त निवास बांधणे २० लक्ष,
हेही वाचा – Good News : पिंपरीतील भाजी मंडई व्यापाऱ्यांच्या ३५ वर्षांच्या संघर्षाला न्याय!
सार्वजनिक शौचालय २० लक्ष, निवारा शेड २५ लक्ष, बाकडे बसविणे २ लक्ष, मंदिर परिसरातील रस्ते कॉंक्रिटीकरण करणे ३० लक्ष, बंदिस्त गटार व्यवस्था करणे १० लक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे १० लक्ष, सुधारणा व सुशोभीकरण करणे २० लक्ष.सोमाटणे येथील श्री चौराई मंदिराकडे जाणारा रस्ता करणे २० लक्ष, पाणी पुरवठा व्यवस्था १२ लक्ष, सौर उर्जा विद्युत यंत्रणा बसविणे ३ लक्ष, नाणोली तर्फे चाकण येथील श्री फिरंगाई देवी मंदिराकडे सार्वजनिक शौचालय युनिट बांधणे २० लक्ष,मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे १ कोटी, वाहनतळ बांधणे २० लक्ष, सुशोभीकरण २० लक्ष, सभामंडप ३० लक्ष, विद्युत यंत्रणा बसविणे १० लक्ष असे एकूण ५ कोटी रुपये २ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
‘क’ वर्ग तीर्थस्थळांचा दर्जा मिळालेली तीर्थस्थळे
श्री कोंडेश्वर देवस्थान, जांभवली
श्री फिरंगाई माता मंदिर, नाणोली तर्फे चाकण
श्री चौराई माता मंदिर, सोमाटणे
श्री संगमेश्वर देवस्थान, वडिवळे
श्री वाघजाई माता मंदिर, खंडाळा
मावळ तालुक्यातील पाच मंदिरांना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा तसेच विकास कामांसाठी पालकमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिल्याने त्यांचे मावळच्या जनतेच्या वतीने आभार मानतो.लवकरच तीर्थस्थळ विकासासाठी उपलब्ध झालेल्या निधीतून विकास कामांना सुरुवात केली जाणार आहे.
– सुनील शेळके, आमदार.





