TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनपा ई क्षेत्रिय कार्यालयांतर्गत संकलीत होणा-या ओला व सुका कच-याचे ९५ टक्के वर्गीकरण

इ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणारा परिसर शंभर टक्के कचराकुंडी मुक्त

पिंपरी | गृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाने शहरी स्वच्छता सर्वेक्षण मोहिम हाती घेतली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२२ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. या अंतर्गत मनपाच्या क्षेत्रिय कार्यालय निहाय ओला व सुका कचरा विलगीकरण करण्यात येत असून महापालिकेच्या ई क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दररोज सरासरी ९५ टक्के ओला व सुका कचरा यशस्वीपणे विलगीकरण करण्यात येत आहे. इ क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणारा परिसर हा शंभर टक्के कचराकुंडी मुक्त झाला आहे. नागरिकांकडून स्वच्छ सर्वेक्षणास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून ही अभिमानाची बाब आहे. भारतातील सर्व शहरांमध्ये पिंपरी चिंचवडला स्वच्छ आणि सर्वात टिकाऊ शहर बनविण्यासाठी आणि देशात पहिल्या तीन शहरांमध्ये क्रमांक पटकाविण्यासाठी मनपा प्रशासनाद्वारे अधिकारी – कर्मचारी तसेच शहरातील नागरिकांनी स्वच्छ शहर बनविण्यासाठी सर्वस्तरावर प्रयत्न् सुरु केले आहे. यामध्ये, नागरिकांची भूमिका महत्वपूर्ण ठरत आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली.

स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे आणि शहरांचे राहणीमान चांगले बनविण्याकरीता समाजातील सर्व घटकांमध्ये महापालिकेमार्फत जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. त्याद्वारे दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या या मोहिमेद्वारे ई क्षेत्रिय कार्यालयांतर्गत दररोज ११० ते १२० टन कचरा संकलीत केला जातो. त्यामध्ये केवळ १.५ टन कचरा हा मिक्स स्वरुपाचा आहे. यात ओला – सुका कचरा, जलपर्णी, हॉटेल वेस्ट, चिकण वेस्ट, सॅनिटरी वेस्ट, डोमेस्टॉक हजरडेस्क इतर कचरा हा डोर टू डोर संकलीत केला जातो. आरोग्य मुकादम, आरोग्य सहाय्यक, आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्ष, ए.एच. ओ., क्षेत्रिय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संकलीत केलेला कचरा घरापासून ते डेपोपर्यंत पोहोचविला जातो. कचरा विलगीकरण न करणा-या नागरिकांना १८० तर व्यावसायिकांकडून ३०० रुपये दंड आकारला जातो. तसेच, मोकळया जागेत बायोमेडीकल वेस्ट टाकणा-यांकडून २५ हजाराचा दंड वसूल केला जात असून त्यांच्यामध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येत आहे.

प्रभाग क्रमांक ३, ४, ५ आणि ७ या कार्यक्षेत्रात इ क्षेत्रिय कार्यालयाचे कामकाज चालते. हा संपूर्ण भोसरी परिसर आहे. यामध्ये शांतीनगर झोपडपटटीचा भाग येत असून कमर्शिअल व रेसीडेन्सी भागात सामाजिक संस्थांच्या सहकार्याने घरोघरी स्वच्छ सर्वेक्षणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. चारही प्रभागानुसार अधिकारी – कर्मचारी यांचे कामकाज वाटप करण्यात आले आहे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देणारी पुस्तकाचे वाटप करून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येत आहे. वार्डात नियमित फेरफटका मारणे, वरिष्ठ अधिकारी यांचेकडून मिळणा-या सुचनांचे पालन करून शेवटच्या कर्मचा-यापर्यंत त्याची माहिती पोहविणे, व्यावसायिक व रेसीडेन्सी सोसायटयांना दोन डस्टबिनचा वापर करण्याबाबत सूचना करण्यासाठी दर आठवडयाला मिटींग आयोजित केली जाते. तसेच, दर शनिवारी प्लॉगेथॉनचे आयोजन करून प्लास्टीक कचरा संकलीत केला जातो. यासाठी प्लास्टीक वेचकांची मदत होत असून या भागातील नागरिकांकडून सर्वतोपरी सहकार्य लाभत आहे. त्यामुळे स्वच्छ भारत मिशन (शहरी) द्वारे आयोजित केलेल्या वार्षिक सर्वेक्षणात नागरिक आणि अधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे स्वच्छतेची भावना निर्माण करणे सहज शक्य होत आहे, असे इ क्षेत्रिय अधिकारी राजेश आगळे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button