breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये 93 मृत्यू; 1 हजार 327 नवीन रुग्णांची नोंद

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड शहरातील नवीन रुग्णांची संख्या घटली, पण वाढते मृत्यू चिंताजनक आहेत. शहराच्या विविध भागातील 1 हजार 293 आणि महापालिका हद्दीबाहेरील 34 अशा 1 हजार 327 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. शहरातील आजपर्यंतची कोरोनाची रुग्णसंख्या दोन लाख पार झाली आहे. तर, 93 जणांचा मृत्यू झाला आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 2469 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील 54 आणि महापालिका हद्दीबाहेरील 39 अशा 93 जणांचा आज मृत्यू झाला. त्यात 63 पुरुष आणि 30 महिला रुग्णांचा समावेश आहे. मागील चोवीस तासात 20 मृत्यू झाले आहेत. यापूर्वी मृत्यू झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्यूचा आकडा वाढला असल्याचे वैद्यकीय विभागाने सांगितले.

शहरात आजपर्यंत 2 लाख 1 हजार 960 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 75 हजार 148 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 2723 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 1256 अशा 3989 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या 8 हजार 545 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 9 हजार 100 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 3 लाख 68 हजार 410 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button