पिंपरी / चिंचवड

गहुंजे क्रिकेट स्टेडीयमवरून 90 हजाराचा मोबाईल चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

गहुंजे येथील क्रिकेट स्टेडीयमवरून एका तरुणीचा 90 हजारांचा मोबाईल फोन चोरीला गेला. ही घटना शनिवारी (दि. 14) रात्री पावणे बारा वाजता घडली.

पूनम शिवकुमार मिश्रा (वय 27, रा. लोहगाव वाघोली रोड, ता. हवेली) यांनी याप्रकरणी तेलगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शनिवारी रात्री गहुंजे क्रिकेट स्टेडीयमवर आयपीएल क्रिकेट मॅच पाहण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी त्यांचा 90 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन त्यांचा मित्र सौरभ उमाशंकर मिश्रा यांच्या खिशात ठेवण्यासाठी दिला होता. स्टेडीयमच्या गेट नंबर एकच्या समोर पार्किंगजवळ त्यांच्या खिशातील मोबाईल फोन चोरीला गेल्याचे उघडकीस आले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button