breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील 90 भंगार गोदामे भुईसपाट, कारवाईचा जोर आजही कायम

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिखली, कुदळवाडी, मोशी परिसरातील अनधिकृत भंगार गोदामांचा प्रश्न गंभीर बनला होता. त्यावर कारवाईची मागणी होऊ लागल्यानंतर अखेर पिंपरी-चिंचवड महापालिका अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने शुक्रवारी (दि.28) चिखलीत धडक कारवाई सुरू केली. कडक पोलिस बंदोबस्तात तब्बल 90 गोदामे पाडण्यात आली.

या भागात भंगार व्यावसायिक निरुपयोगी साहित्य जाळतात. तेथे धूर व दुर्गंधी पसरते. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या प्रकारांबाबत तक्रारी महपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रारी होत होत्या. परवानगीविना उभारलेल्या अनधिकृत गोदामांचा प्रश्न गंभीर बनत चालल्याकडे लक्ष वेधले गेले होते. त्यानंतर महापालिका व इतर यंत्रणांनी खडबडून जागे होत कारवाई तयारी सुरू केली. कारवाईपूर्वी सुमारे अडीचशे  भंगार गोदामांना नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या.

त्यानंतर शुक्रवारी पालिका अधिका-यांची मोठ्या पोलिस बंदोबस्तात चिखलीतील रिव्हर रेसेडेन्सी लगतच्या भंगार गोदामांवर कारवाई सुरू केली. तेथील एकूण 1 लाख 10 हजार 868 चौरस फुटांवरील एकूण 90 भंगार गोदामे पाडण्यात आली. ही कारवारी सहशहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पालिकेचे 4 उपअभियंता, 8 कनिष्ठ अभियंता, 15 बीट निरिक्षक कारवाईसाठी उपस्थित होते. तर, तीन पोलीस निरीक्षक, 2 सहायक पोलीस निरीक्षक, 95 पोलीस कर्मचा-यांच्या कडक बंदोबस्तात ही कारवाई झाली. भंगार साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका पर्यावरण व आरोग्य विभागाचीही मदत घेण्यात आली होती.

आजही होणार धडक कारवाई

महापालिकेने संयुक्तरित्या नियोजन करून ही कारवाई मोहीम आखली आहे. त्यात पहिल्या दिवशी 90 गोदामांवर कारवाई झाली आहे. सलग दुस-या दिवशी शनिवारी देखील अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून कारवाई होणार आहे. त्याची तयारी पालिका प्रशासनाने केली असून नियोजनबध्दरित्या कारवाई केली जात असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button