पिंपरी / चिंचवड

कंपनीच्या साईटवरून 86 हजारांचा माल चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

भूमकर चौक येथील एका कंपनीच्या साईटवरून एका चोरट्याने 86 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 26) दुपारी साडेचार वाजता घडली.

बादशहा महादेव माने (वय 50, रा. न-हे, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चंदू गोरख सकट (वय 32, रा. देहूरोड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमकर चौक वाकड येथे एका कंपनीच्या साईटवर लोखंडी प्राप्स, लोखंडी वेलर, लोखंडी व्हर्टीकल,, लोखंडी लेजर असे साहित्य होते. आरोपी चंदू सकट याने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय कंपनीच्या साईटवरील 86 हजारांचे वरील साहित्य चोरून नेले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button