Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

पर्ल ग्रुपची ७५ एकर जमीन आणि ७.५ कोटी जप्त, ईडीची मोठी कारवाई

मुंबई: पर्ल ग्रुपविरोधात ईडीने मोठी कारवाई केलीये. पर्ल ग्रुपची मुंबई आणि पुण्यातील ७५ एकर जमीन ईडीने जप्त केलीये. तर बँकेतील साडे सात कोटीही ईडीने जप्त केले आहेत. ६० हजार कोटींच्या चिटफंड घोटाळ्यातील चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत ही कारवाई केलीये.

६० हजार कोटींच्या चिटफंड घोटाळ्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. त्या तपासात जी माहिती आणि कादगपत्र पुढे येत आहे त्याच्या आधारे या ग्रुपच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. यानुसार वसई पट्ट्यातील ७५ एकरची जमीन जप्त करण्यात आली आहे. याची किंमत जवळपास १८७ कोटी असल्याची माहिती आहे. तसेच, याचसंदर्भातील बँक खात्यातून साडेसात कोटींची रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

६० हजार कोटी रुपयांचा घोटाळा

पर्ल ग्रुपच्या माध्यमातून देशातील विविध राज्यांमधील साडेपाच कोटी गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप आहे. तब्बल ६० हजार कोटी रुपयांचा हा गुंतवणूक घोटाळा आहे. पर्ल घोटाळ्याचा तपास सीबीआय आणि ईडी करत आहे. दिल्ली, चंदीगड, कोलकाता, भुवनेश्वर यासह अनेक ठिकाणी सीबीआयने छापे टाकून चौकशी केली आहे. याप्रकरणात गेल्यावर्षी २३ डिसेंबर रोजी ११ जणांना अटक करण्यात आली होती. त्यात कमलजीत सिंग याच्यासह चंद्रभूषण ढिल्लो, प्रेम सेठ, मनमोहन कमल महाजन, मोहनलाल सहजपाल आणि कंवलजीत सिंग यांचा समावेश होता. मुख्य आरोपींना साथ दिल्याचा सर्वांवर आरोप आहे.

त्याआधी सीबीआयने ८ जानेवारी २०१६ रोजी या घोटाळ्याचा म्होरक्या पर्ल गोल्डन फॉरेस्ट लिमिटेडचा सीएमडी व पर्ल ऑस्ट्रेलिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा माजी अध्यक्ष निर्मलसिंह भंगू तसेच पर्ल अ‍ॅग्रोटेक कॉर्पोरेशनचा एमडी व प्रमोटर सुखदेव सिंग, कंपनीचा कार्यकारी संचालक गुरमीत सिंग, सुब्रत भट्टाचार्य यांना अटक केली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button